विठ्ठलाकडे जाण्‍याचा ‘मार्ग’ प्रशस्‍त ! 

मंदिर परिसराच्‍या विकासासमवेत मंदिरांना भक्‍तीरस आणि धर्मशिक्षण यांची केंद्रे बनवा !

सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर त्‍यांनी मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे ! – परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज, ‘स्‍वस्‍तिक पीठा’चे पीठाधीश्‍वर, उज्‍जैन

हिंदु जनजागृती समितीने ‘सरकार अधिग्रहित मंदिरात भेदभाव का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ आयोजित केलेला विशेष संवाद !

मंदिरे पर्यटनस्थळे नाहीत !

प्रत्येक भाविकाने तीर्थस्थळ किंवा देवालय हे निव्वळ पर्यटनस्थळ नसून आपले ऊर्जा स्थान आहे, हे लक्षात घ्यावे.

आज खरशिंग (जिल्हा सांगली) येथील श्रीराम मंदिरातील मूर्तीप्रतिष्ठापना सोहळ्यास प्रारंभ !

वठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग येथील दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या श्रीराममंदिर, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पादुका मंदिरातील मूर्तीप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्याला प्रधान संकल्प मातृकापूजन उदक शांतीने प्रारंभ झाला.

परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळांचा सर्वांगीण विकास आणि संवर्धन यांसाठी बैठक घेणार ! – मुख्यमंत्री

परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळांच्या सर्वांगीण विकास आणि संवर्धन यांसाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसमोर उपस्थित केला हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांचा विषय !

अशा बातम्यांमुळे भारतातील सर्व लोक चिंतित असणे आणि आम्ही व्यथित होणे स्वाभाविक आहे. या भावना आणि चिंता पंतप्रधान अल्बनीज यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

श्री कालिकामातेच्‍या मंदिरातून सोन्‍याचा हार चोरणार्‍या महिलेविरोधात गुन्‍हा नोंद !

महिलांनी देवीच्‍या गळ्‍यातील सोन्‍याचा हार चोरणे याहून महापाप ते कोणते ? अशा महिलांना कठोर शिक्षाच व्‍हायला हवी !

मंदिरेही असुरक्षित ?

महान भारतीय संस्‍कृती असलेल्‍या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्‍यासाठी छोट्यातल्‍या छोट्या गुन्‍ह्यालाही त्‍वरित कठोर शिक्षा होणे आवश्‍यक आहे.

पंढरपूर मंदिरात सजावटीसाठी वापरलेली १ टन द्राक्षे गायब !

मंदिरातील द्राक्षांच्या संदर्भात अशी स्थिती असेल, तर मंदिरात अर्पण स्वरूपात येणारे धन किती सुरक्षित रहात असेल ? असा प्रश्‍न भाविकांना पडल्यास चूक ते काय ? या उदाहरणावरून मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम लक्षात येतात.

मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ येथील शिवलिंगाला भेसळयुक्त पदार्थांच्या अभिषेकामुळे भेग !

कोरोना काळापासून मंदिरात दुग्धाभिषेक बंद करण्यात आला आहे. गेल्या ८ ते १० मासांपासून रसायनयुक्त पदार्थांसह विधी केल्याने शिवलिंग खराब होत आहे, असे मंदिरातील पुजार्‍यांच्या लक्षात आले.