मुंबई, ११ मार्च (वार्ता.) – परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळांच्या सर्वांगीण विकास आणि संवर्धन यांसाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले. सदस्य धनंजय मुंडे यांनी याविषयी लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. त्याला ते उत्तर देत होते. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्यासाठी याविषयीचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.