कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील ७ वनक्षेत्रांना ‘संवर्धन राखीव क्षेत्रा’चा दर्जा
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत वन्यजिवांचा प्रामुख्याने वाघांचा ‘कॉरिडॉर’ असलेल्या कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी ते आंबोलीपर्यंतचा सलग एकूण ८६ सहस्र ५५४ हेक्टरच्या वनक्षेत्राला वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण मिळणार आहे.