जळगावच्‍या हिंदु एकता दिंडीत भक्‍ती आणि शौर्य यांचा संगम !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने २७ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता शहरात ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले होते.

हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज ‘भगवा’च असला पाहिजे, ही मोहीम राबवायला हवी ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

२२ मे या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘शिवचरित्र, गडकोट मोहीम आणि हिंदवी स्वराज्य कडा पहारा’ या विषयावर येथील सत्यनारायण बजाज, सार्वजनिक वाचनालय, वर्धा येथे पू. भिडेगुरुजींचे सार्वजनिक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.

दगडफेक करणारे धर्मांध आणि सूत्रधार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !

जळगाव येथे २३ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात अशी मागणी करण्यात आली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने सासवड येथे ६०० हून अधिक मुली आणि महिलांना दाखवला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर यांनी तिकीट काढून आतापर्यंत ६७० तरुण मुली आणि महिला यांसाठी सत्य घटनेवर आधारित असणारा ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट दाखवला आहे.

हिंदुविरोधी कारवाया करणार्‍यांच्या विरोधात संघटितपणे कृती करण्याचा सकल हिंदु समाजाचा निर्धार !

विविध ठिकाणी हिंदूंचे मोर्चे निघूनही आज धर्मांध मुसलमांकडून हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी कारवाया वाढत आहेत. तरी अशा प्रकारे हिंदुविरोधी कारवाया करणार्‍यांच्या विरोधात संघटितपणे कृती करण्याचा निर्धार हिंदु संघटनांनी केला.

सातारा येथे हिंदु जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राजलक्ष्मी चित्रपटगृहाबाहेर युवतींचे प्रबोधन !

हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी पाहू नका, तर तुम्ही स्वत: जागृत व्हा आणि इतरांनाही जागृत करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. 

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात नगर येथील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज, पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची अपकीर्ती आणि बजरंग दलाचा अवमान यांच्‍या निषेधार्थ आंदोलन !

आंदोलनानंतर छत्रपती शिवाजी महाराज, तसेच महापुरुष यांचा जाणीवपूर्वक अवमान आणि हेतू:पुरस्‍सर अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्‍हापूर जिल्‍हाधिकारी यांना निवेदन देण्‍यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्‍हाधिकारी भगवान कांबळे यांनी स्‍वीकारले.

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने महिलांसाठी ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे आयोजन !

द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून महिलांना वस्तूस्थिती समजावी, तसेच या चित्रपटास होणार्‍या विरोधास प्रत्युत्तर म्हणून ६ मे या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने महिलांसाठी विजयनगर येथील ‘ऑरम’ चित्रपटगृहात ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.

राजेश क्षीरसागर यांनी घेतली पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची सदिच्‍छा भेट !

राज्‍य नियोजन मंडळाचे अध्‍यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची त्‍यांच्‍या येथील निवासस्‍थानी सदिच्‍छा भेट घेऊन त्‍यांचे आशीर्वाद घेतले.