कोपरखैरणे येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांची सभा निर्विघ्‍नपणे पार पडली !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, नवी मुंबई विभागाच्‍या वतीने पू. संभाजी भिडेगुरुजी यांची कोपरखैरणे येथे १६ जुलै या दिवशी जाहीर सभा आयोजित करण्‍यात आली होती. वंचित बहुजन आघाडीसह अन्‍य संघटनांनी या सभेला विरोध केला होता; मात्र पोलिसांच्‍या चोख बंदोबस्‍तामुळे सभा निर्विघ्‍नपणे पार पडली.

आज विशाळगड येथील अतिक्रमणाच्‍या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकणार ! – नितीन शिंदे

शूर मावळ्‍यांच्‍या बलीदानाने पावन झालेल्‍या विशाळगडावर धर्मांधांनी अवैध अतिक्रमण करून संपूर्ण गड विद्रुप केला आहे. त्‍याच्‍या विरोधात सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने गुरुवार, १३ जुलैला सांगली येथे सकाळी १०.३० वाजता लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंदिर येथे आंदोलनाचे रणशिंग फुंकण्‍यात येणार आहे

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने १५ ऑगस्‍टला प्रत्‍येक जिल्‍ह्यात ‘हिंदवी स्‍वराज्‍य स्‍वातंत्र्यदिन पदयात्रा’ ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

यंदाच्‍या वर्षापासून १५ ऑगस्‍टला श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने झेंडावंदन झाल्‍यावर ‘हिंदवी स्‍वराज्‍य स्‍वातंत्र्यदिन पदयात्रा’ काढण्‍यात येतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

तिरंग्‍याच्‍या आडून कुणी भगव्‍या ध्‍वजाला विरोध करत असेल, तर सकल हिंदु समाज खपवून घेणार नाही ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

पंतप्रधानांच्‍या नावे दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, देश स्‍वतंत्र्य होऊन हिंदु समाज अजूनही अत्‍याचार सहन करत आहे. त्‍यामुळे भारत देशाला ‘हिंदु राष्‍ट्र’ घोषित करावे, अशी मागणी आहे.

सांगली जिल्ह्यात ‘महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम’ची काटेकोर कार्यवाही व्हावी ! – गोरक्षकांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिळत असलेल्या खात्रीशीर माहितीनुसार कारवाईच्या प्रसंगी पिंपरी, मालेगावप्रमाणे प्राणी रक्षण पथक उपलब्ध व्हावे, तसेच सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमची काटेकोर कार्यवाही व्हावी असे निवेदन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांना देण्यात आले.

जंगली महाराज रस्‍ता येथे येथे पू. भिडेगुरुजींनी केले पालखीचे सारथ्‍य !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी जंगली महाराज रस्‍ता येथे संतश्रेष्‍ठ तुकाराम महाराज यांच्‍या पालखीचे सारथ्‍य केले. या वेळी सहस्रोंच्‍या संख्‍येने धारकरी उपस्‍थित होते.

राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज होणे आवश्यक ! – डॉ. समीर घोरपडे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असतांना सिद्धी जोहरचा वेढा  तोडण्यासाठी वयाच्या ६० व्यावर्षी जिजाऊंनी हातात शस्त्रे घेतली आणि प्रत्यक्ष रणांगणावर जाण्याची सिद्धताही केली.

क्षेत्र चाफळ येथे ‘श्री शिवराज्‍याभिषेकदिन’ उत्‍साहात साजरा !

श्रीक्षेत्र चाफळ येथे हिंदु एकता आंदोलन आणि श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ३५० वा ‘श्री शिवराज्‍याभिषेकदिन’ मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला.

हिंदू मुलींनी आत्मरक्षणासह धर्माधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे ! – विक्रम पावसकर

भारतामध्ये प्रतिवर्षी  सहस्रो हिंदू मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. यासाठी शुद्धधर्माचरण महत्त्वाचे असून हिंदू मुलींनी आत्मरक्षणासह धर्माधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

जळगावच्‍या हिंदु एकता दिंडीत भक्‍ती आणि शौर्य यांचा संगम !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने २७ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता शहरात ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले होते.