शाळेची घंटा वाजली; पण…!
कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेल्या शाळा (मधला काही कालावधी सोडला तर) १८ मासांनी पुन्हा ४ ऑक्टोबरपासून पूर्ववत् चालू झाल्या. बहुसंख्य ठिकाणी ‘शाळा चालू होणार’ याचा आनंद विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि शाळेशी संबंधित व्यावसायिक यांच्या तोंडवळ्यावर ओसंडून वहात होता.