दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

हिंदु राष्ट्र या संकल्पनेची कुणी पूर्वी कल्पनाच केलेली नव्हती; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ही संकल्पना या दैनिकाच्या माध्यमातून जनमानसात रूजवली.

‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र नव्हे, तर शास्त्र किंबहुना शस्त्र आहे ! – प्राचार्य डॉ. मनोज कामत

‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून एक दैवी आणि आध्यात्मिक शक्ती घरात प्रवेश करतांनाची अनुभूती प्रत्येक वाचकाला येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रज्वलित केलेला हा नंदादीप आहे. धर्मतेज आणि क्षात्रतेज या दोन्हीचे सार यात सामावलेले आहे !

‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात माजी संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते पूजन

यानिमित्त श्री गणपति, श्री सरस्वती आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्थापक-संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली अन् पुढील कार्यही असेच अविरत चालू रहाण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

‘सनातन प्रभात’ वाचूया !

‘सनातन प्रभात’मध्ये शब्दांना धार आहे, वजन आहे ।
धर्माचरणाचे ज्ञान आहे गुरुरूपे तो दिशादर्शक आहे ।। २ ।।

हिंदु धर्म संवर्धनाचे अलौकिक कार्य करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ !

‘जगात भारतासारखा देश नाही आणि हिंदु धर्मासारखा धर्म नाही’, याची जाणीव सर्वांनी ठेवूया आणि हिंदु राष्ट्र येण्यासाठी एक होऊया ! ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।’

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प्रबोधनानुसार आजपासून कृतीला आरंभ करा !

‘सनातन प्रभात’ आधुनिक काळातील पुरोहित असून तो सतत देशस्थ (देशात रहाणार्‍या) हिंदूंना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. गेली २ तपे म्हणजे २४ वर्षे अखंडपणे ‘सनातन प्रभात’ प्रतिदिन प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला धर्मबोध, राष्ट्रबोध आणि साधनाबोध देत आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधकांकडून होणार्‍या चुका दाखवून त्यांना परिपूर्ण सेवा करण्यासाठी घडवणारी गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

दैनिक ‘सनातन प्रभात’ वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि ‘ते साधकांना कसे घडवत आहेत ?’, याविषयीचे लिखाण कृतज्ञतापूर्वक देत आहे.

‘सनातन प्रभात’प्रमाणे हिंदु राष्ट्राचे प्रचारक बनण्याचा निश्चय करा !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश

संपादकीय : दैनिक ‘सनातन प्रभात’ची लेखणी !

श्रीमन्नारायण भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात योगदान देण्यास कटीबद्ध असणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची ही लेखणी आपत्काळातही प्रतिदिन तिचे शब्दपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे आणि त्याच्याच कृपाशीर्वादाने येत्या काळातही करत राहील !

अंमळनेर (जिल्हा जळगाव) येथे दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू केल्यावर आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव !

शिबिरामध्ये सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी समष्टी ध्येय घेण्यास सांगितले होते. तेव्हा अंमळनेर तालुक्यातही दैनिक चालू करण्याचे ध्येय ठरवले. त्या वेळी आलेले अनुभव देत आहे.