‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात माजी संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते पूजन

‘सनातन प्रभात’चे पूजन करतांना माजी संपादक पू. पृथ्वीराज हजारे आणि मंत्रपठण करतांना पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर

रामनाथी (गोवा) – दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात ९ एप्रिल या दिवशी प्रकाशित करण्यात आलेल्या ‘द्वितपपूर्ती विशेषांका’चे पूजन माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते करण्यात आले, तर सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. सिद्धेश करंदीकर यांनी मंत्रपठण केले.

गेली २४ वर्षे ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य अविरत चालू आहे. यानिमित्त श्री गणपति, श्री सरस्वती आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्थापक-संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली अन् पुढील कार्यही असेच अविरत चालू रहाण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

या वेळी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक श्री. नागेश गाडे आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची सेवा करणारे साधक उपस्थित होते.