‘सनातन प्रभात’प्रमाणे हिंदु राष्ट्राचे प्रचारक बनण्याचा निश्चय करा !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वाहिलेले भारतातील एकमेव नियतकालिक आहे. प्रतिदिन राष्ट्र आणि धर्म यांच्यावरील संकटांच्या संदर्भात जागृती करणार्‍या वार्ता अन् लेख ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित केले जातात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता सांगणे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समाजाची मानसिकता सिद्ध करणे, हा त्यामागील हेतू असतो. आज ‘सनातन प्रभात’ वाचणारे सहस्रांहून अधिक वाचक हिंदु राष्ट्राचे समर्थक बनले आहेत. ‘सनातन प्रभात’ने पत्रकारितेच्या माध्यमातून इतिहासात केलेले हे एक दिव्य कार्य आहे. सध्याचा संक्रमण काळ पहाता केवळ हिंदु राष्ट्राचे समर्थक बनून उपयोग नाही, तर भारतात घटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र बनण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार योगदान देणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान देण्याची एक दिशा म्हणजे ‘सनातन प्रभात’मधील वार्ता आणि लेख यांच्या आधारे हिंदु राष्ट्राचा प्रचार करणे. थोडक्यात ‘सनातन प्रभात’प्रमाणे हिंदु राष्ट्राचे प्रचारक बनण्याचा निश्चय करा !

–  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक-संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह