मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रत्यक्ष लाभलेला सहवास आणि त्यांच्या सत्संगात मिळालेली अनमोल शिकवण !

मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रत्यक्ष लाभलेला सहवास आणि त्यांच्या सत्संगात मिळालेली अनमोल शिकवण !

शीघ्र ही श्री. संजय पाएं गुरुचरण ।

फाल्गुन शुक्ल पक्ष द्वितीया (४.३.२०२२) या दिवशी वाराणसी सेवाकेंद्रातील श्री. संजय सिंह यांचा ४७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ. सानिका संजय सिंह यांनी केलेली कविता पुढे दिली आहे.

शेवटची १५ मिनिटे !

आयुष्याच्या शेवटच्या १५ मिनिटांची वाट पहाण्यापेक्षा जीवन जगतांनाच प्रतिदिन १५ मिनिटे देऊन आत्मचिंतन करून स्वतःत सुधारणा केली पाहिजे, तर आयुष्यात पश्चात्तापाची वेळ येणार नाही. त्यामुळे संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे शेवटचा दिवस खर्‍या अर्थाने गोड होईल !

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ या श्रीमद्भगवद्गीतेतील वचनानुसार, देव केवळ भक्ताचे रक्षण करतो. साधना किंवा धर्मासाठी काही न करणार्‍यांना देव वाचवणार नाही; मग धर्मांधांनी आक्रमण केल्यास देवाप्रमाणे इतरही अशांना वाचवण्याचा विचार कशाला करतील ?’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांप्रती कृतज्ञताभाव असणार्‍या आणि इतरांचा विचार करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सुश्री (कु.) कला खेडेकर (वय ५३ वर्षे) !

आम्ही काही साधिका पू. सिंगबाळआजींच्या आणि त्यांच्या साहाय्याकरता जातो. त्याविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि त्या अतिशय प्रेमाने ते व्यक्तही करतात.’

नियती मानवाला त्याच्या कर्मफलातून मुक्त करत देवाकडे सोपवत असल्याने नियती ही देवाने समस्त मानवजातीवर केलेली कृपाच आहे !

ईश्वर नियतीचे माध्यम बनवून निर्मळ प्रीतीने आणि उदात्तभावाने जिवाकडून नियमांचे काटेकोर पालन करवून घेतो. ‘ही गुरुमाऊलीचीच माया आहे’, हे कळणे साधनेविना अशक्य आहे; म्हणून मानवाला गुरुमार्ग हवा.

प.पू. दास महाराज यांनी ‘विदेही स्थिती’विषयी केलेले विवेचन !

विदेही, म्हणजे निर्विकल्प. त्याला कसलाच विकल्प नाही आणि शरीरच नाही. तो शरीर सोडून निराकार तत्त्वाकडे जातो, म्हणजे निर्विकाराकडे जातो.

ईश्वरपूर (इस्लामपूर, सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

प्रेमभाव असलेले आणि सचोटीने वारकरी संप्रदायानुसार साधना करणारे, सतत देवाच्या अनुसंधानात असलेले, तसेच मुलाला साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे श्री. राजाराम भाऊ नरुटे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले.

फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती रेखाराणी वर्मा (वय ७२ वर्षे) यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

‘एकदा वर्माकाकू मी सेवा करत असलेल्या ठिकाणी आल्या होत्या. तेव्हा मी त्यांना प्रथमच पहात होते. त्या वेळी देवाच्या कृपेने मला त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जागी शिवपिंडी दिसणे, त्या वेळी ‘हरि-हर नाही भेदाभेद’ ही पंक्ती मनात येणे आणि आगामी काळात लयाशी संबंधित कार्य होणार असल्याने परात्पर गुरुदेवांनी शिवपिंडीच्या रूपात दर्शन दिल्याचे जाणवणे

‘परात्पर गुरु डॉक्टर हेच श्रीविष्णु आहेत, तेच शिव आहेत आणि तेच सर्वस्व आहेत. काळानुसार त्यांचे सूक्ष्मातील कार्य भिन्न आहे; म्हणून ते विविध रूपांत दिसतात. यापुढील काळात लयाशी संबंधित कार्य होणार असल्याने त्यांनी शिवपिंडीच्या रूपात दर्शन दिले.