‘एकदा वर्माकाकू मी सेवा करत असलेल्या ठिकाणी आल्या होत्या. तेव्हा मी त्यांना प्रथमच पहात होते. त्या वेळी देवाच्या कृपेने मला त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. वर्माकाकूंना पहाताक्षणी मला शांत वाटले.
२. काकूंच्या तोंडवळ्यावर समाधान जाणवत होते.
३. ‘त्यांना कोणत्याच गोष्टीची आसक्ती राहिली नाही’, असे मला वाटले. याविषयी मी त्यांची कन्या नंदिताताई (नंदिता वर्मा) हिला सांगितले. तेव्हा तिने ‘तुला जे जाणवले, ते सत्य आहे’, असे सांगितले.
४. ‘काकू सतत देवाच्या अनुसंधानात असतात’, असे मला जाणवले.

५. एकदा मी काकूंच्या घरी गेले होते. तेव्हा मला त्यांच्या घरी शांत वाटत होते. देवळात गेल्यावर जसे शांत वाटते, तशी शांतता तेथे होती.
६. ‘काकू पुष्कळ स्थिर असून त्यांची आंतरिक साधना चालू आहे’, असे मला जाणवले.’
– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१०.२०२१)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
प्रसिद्धी पराङ्मुख आणि इतरांना साहाय्य करणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील सनदी लेखापाल (चाटर्ड अकाऊंटंट) श्री. मनीष पारेख (वय ६० वर्षे) !
वयोवृद्ध असूनही स्वावलंबी आणि प्रेमळ असणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वापी (गुजरात) येथील श्रीमती वीरमतीबेन शुक्ल (वय ८९ वर्षे)!
स्वावलंबी आणि निरपेक्ष असलेले फोंडा (गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गजानन आळशी (वय ९३ वर्षे) !
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे
सर्वांपर्यंत साधना पोचवण्याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (वय ६२ वर्षे) !