गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक

कार्यानुमेय सिद्धींच्या वापराची आवश्यकता असल्यास गुरु त्या त्या वेळी सिद्धी उपलब्ध करून देतात.

गुरुपौर्णिमेला ३७ दिवस शिल्लक

शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूती देतात, त्यांना गुरु असे म्हणतात. 

इतर साधनामार्गांपेक्षा भक्तीयोगाचे समाजासाठीचे योगदान अधिक  !

इतर साधनामार्गातील संतांच्या तुलनेत भक्तीमार्गातील संतांचे भक्त आणि शिष्य यांची संख्या अधिक असते. त्यामुळे भक्तीमार्गी संतांनीच खर्‍या अर्थाने समाजाच्या उद्धारासाठी अधिक कार्य केलेले आहे.

भीतीपेक्षा प्रेमाचा धाक असावा !

लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील, तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकांत बसवतात आणि मग उत्तम रितीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले, तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल.

भगवंताविषयी प्रेम वाटण्यासाठीचे ३ मार्ग

भगवंत हवासा वाटणे, यामध्ये सर्व मर्म आहे. समाधान न मिळायला खरे कारण कोणते असेल, तर ‘आम्हाला अजून भगवंताची नड (आवश्यकता) आहे’, असे वाटत नाही. भगवंताचे प्रेम यायला एकंदर ३ मार्ग आहेत.

आत्मसत्तेला पूर्णपणे प्राप्त केलेले आत्मारामी बायस दैवी संपदेमुळे पूर्ण तृप्त झालेले असणे

आत्मारामी बायस म्हणाले, ‘‘मी कंगाल नाही. कंगाल ते लोक आहेत, जे नश्वर संपदेला आपली संपदा मानतात आणि आपल्या आत्मसंपदेपासून वंचित रहातात.

बुद्धीमान मनुष्य बाह्यसुखे सोडून आंतरिक सुखात रममाण होणे

तुम्ही जितके तुच्छ भोग भोगता, तितकी तुमची मन:शक्ती आणि प्राणशक्ती दुर्बळ होते.