आत्मसत्तेला पूर्णपणे प्राप्त केलेले आत्मारामी बायस दैवी संपदेमुळे पूर्ण तृप्त झालेले असणे

आत्मारामी बायस म्हणाले, ‘‘मी कंगाल नाही. कंगाल ते लोक आहेत, जे नश्वर संपदेला आपली संपदा मानतात आणि आपल्या आत्मसंपदेपासून वंचित रहातात. मी माझी संपूर्ण आत्मसंपदा माझ्या सोबत घेऊन जात आहे. माझी ही संपदा कुणीही हिसकावू शकत नाही. ही संपदा उचलण्याचे काही ओझे वाटत नाही. समतेचा सुगंध, चारित्र्याचे सामर्थ्य आणि अनंत ब्रह्मांडांमध्ये व्याप्त सत्-चित्-आनंद स्वरूप प्राणीमात्राचे अधिष्ठान आत्मदेव आहेत. त्यांच्याच सत्तेमुळे सर्वांच्या हृदयाची स्पंदने चालतात आणि सर्वांचे चित्त चेतन रहाते. त्या आत्मसत्तेला मी पूर्णपणे प्राप्त केले आहे. त्या पूर्ण संपदेमुळे मी पूर्ण तृप्त झालो आहे. मी बिचारा नाही, मी कंगाल नाही किंवा मी गरीबही नाही. गरीब, बिचारे आणि कंगाल तर ते लोक आहेत, जे मानवी शरीर मिळवूनही आपल्या आत्मसंपदेपासून वंचित रहातात.’’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)