‘मनुष्य जितका खालच्या दर्जाचा असतो, तितके इंद्रियसुखात त्याला अधिक सुख वाटते. मनुष्य जितका बुद्धीमान असेल, तितके बाह्यसुख त्याला तुच्छ वाटेल आणि आंतरिकसुख त्याला श्रेष्ठ वाटेल. मुलगा जितका अल्पमती असेल, तितके त्याला चॉकलेट आणि बिस्किटे महत्त्वपूर्ण वाटतील. तो सोन्याचे दागिने, हिरे-जवाहिर चोखून सोडून देईल. मुलगा जितका बुद्धीमान होत जाईल, तितका तो या वस्तूंचा स्वीकार करील आणि चॉकलेट अन् बिस्किटे यांच्या फंदात पडणार नाही. त्याचप्रमाणे मानवजातीचे हाल चालले आहेत. मनुष्य जितका अल्पमतीचा असतो, तितका तो क्षणिक सुखात, आवेगात, आवेशात आणि भोगात रममाण होतो. जितका बुद्धीमान असेल, तितका त्यातून तो उन्नत होतो. तुम्ही जितके तुच्छ भोग भोगता, तितकी तुमची मन:शक्ती आणि प्राणशक्ती दुर्बळ होते.’ (साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)