गुरुपौर्णिमेला ३० दिवस शिल्लक

आपल्या गुरूंकडून आणि इतर संतांकडून जे ज्ञान मिळाले, ते शिष्याला उदार हस्ते देण्याची गुरूंना तळमळ असते.

गुरुपौर्णिमेला ३१ दिवस शिल्लक

अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण-रूपाची सेवा आहे. ही गुरुकृपेसाठी ७० टक्के महत्त्वाची आहे, तर गुरूंच्या सगुणरूपाची सेवा ही ३० टक्के महत्त्वाची आहे. पूर्ण गुरुकृपेसाठी दोन्ही करणे आवश्यक आहे. 

गुरुपौर्णिमेला ३२ दिवस शिल्लक

शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूती देतात, त्यांना गुरु असे म्हणतात.

गुरुपौर्णिमेला ३३ दिवस शिल्लक

गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो.

गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्‍लक

‘गुरु विश्‍वासावर आहे. आपल्‍या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्‍यापण विश्‍वासावर आहे. तुमच्‍या विश्‍वासातच गुरु आहे.

संत संगतीसाठी नामाचे महत्त्व !

नाम हे सर्व साधनांत स्‍वाक्षरीसारखे आहे. हुकूम कितीही कडक असेना का; परंतु त्‍याच्‍याखाली जर स्‍वाक्षरी नसेल, तर त्‍या हुकुमाला महत्त्व नाही.

खरे गुरु स्‍वतःला मिळालेले सर्व समाजालाच देत असणे 

खरे गुरु, तर देणेच देणे पसंत करतात आणि घेतात, तेही देण्‍यासाठीच घेतात. ते घेतांना दिसतात; परंतु घेतलेल्‍या वस्‍तू त्‍या फिरून पुनश्‍च त्‍या समाजाच्‍या हितासाठी आणि सेवेसाठीच देऊन टाकतात.

गुरुपौर्णिमेला ३५ दिवस शिल्लक

योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालविता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते.