माणसाचे मुख्य कर्तव्य !

माणसाचे गौण कर्तव्य आहे, ‘ऐहिक संबंधाचे व्यवहार’ आणि मुख्य कर्तव्य आहे, ‘शाश्वत परमात्म्याशी संबंध जागृत करणे अन् त्यात स्थित होणे.’ जो आपले मुख्य कर्तव्य पाळतो, त्याचे गौण कर्तव्य आपोआप प्रकृतीद्वारे सावरले जाते.

गुरुपौर्णिमेला २७ दिवस शिल्लक

एक बद्ध जीव दुसर्‍या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात !     

समाधान केव्हा मिळते ?

‘भोग प्रारब्धाने येतात’, असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात’, असे म्हटले की, समाधान मिळेल.

सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे

दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख, हे प्रकृतीचे चक्र आहे; परंतु हे चक्र बंद पाडून सुखात, तसेच दुःखात एक आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म आहे. मायेच्या सागरात परमार्थाचा प्रवास करणार्‍यांना, अज्ञानाच्या अंधारातून सुरेख मार्गदर्शन सद्गुरूंकडून घडत असते.

गुरुपौर्णिमेला २८ दिवस शिल्लक !

गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करत असतात.

gurupournima

गुरुकृपा

गुरुशिष्यांचे मंगल नाते प्रस्थापित झाल्यानंतर सद्गुरु हेच जणू आरसा होतात आणि त्या आरशात शिष्य स्वतःलाच पाहू लागतो.

गुरुपौर्णिमेला २९ दिवस शिल्लक

वेद, शास्त्र, स्मृती वगैरेंच्या बहुवाक्यतेचे एकवाक्यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः  त्यांचे शब्दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा, हे गुरुकृपेने कळते.

वासना क्षीण करण्याचा मार्ग

जो जिवंतपणी वासनारहित राहिला, त्याला सुख-दु:ख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे. असे रहाण्याने वासना क्षीण होईल.