गुरुपौर्णिमेला २१ दिवस शिल्लक
चंदन स्वतःला घासून घेऊन दुसर्यांना सुगंध देते; त्याप्रमाणे असा गुरु प्रभुकार्यासाठी स्वतःला झिजवून जगात सुगंध पसरवतो. असा गुरु वाणीने नाही तर स्वतःच्या वर्तनाने उपदेश देत असतो.
चंदन स्वतःला घासून घेऊन दुसर्यांना सुगंध देते; त्याप्रमाणे असा गुरु प्रभुकार्यासाठी स्वतःला झिजवून जगात सुगंध पसरवतो. असा गुरु वाणीने नाही तर स्वतःच्या वर्तनाने उपदेश देत असतो.
मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.
आपले जीवन देवाच्या हाती आणि देव नामाच्या स्वाधीन आहे’, हे पक्के लक्षात ठेवा.
जेव्हा भक्त शेकडो जन्म सात्त्विक, श्रद्धायुक्त, वैदिक पद्धतीने विधीपूर्वक ईशाची उत्तम आराधना करतात, तेव्हा (एखाद्या जन्मात) प्रभु ईश, म्हणजे शंकर, संतुष्ट होऊन साक्षात् गुरुरूपाने दृग्गोचर होतात.
ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली, तो जगाचा स्वामी होईल.
शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय. शिष्य जरी गुरूंवर खूप रागावला असला, तरी गुरु मात्र त्याला सांभाळून घेतात.
श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणार्या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही.
भाव असल्याविना परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो, त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाविना चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याविना होत नाही. जसा तुमचा भाव असेल, त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल.
बिंब-प्रतिबिंब न्यायाने शिष्याच्या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्या मनात उमटून त्यांना शिष्याचे विचार कळतात.
भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला, तर सद्गुरूंची कृपा झाल्याविना रहात नाही.