
‘गुरुशिष्यांचे मंगल नाते प्रस्थापित झाल्यानंतर सद्गुरु हेच जणू आरसा होतात आणि त्या आरशात शिष्य स्वतःलाच पाहू लागतो. सद्गुरु रूप आरशाची किमया अशी की, साध्या आरशाप्रमाणे तो ‘जसे असेल, तसे दाखवत नाही’, तर ‘जसे असावे, तसे दाखवतो.’ एक प्रकारे ‘आदर्श शिष्य कसा असावा ?’, हे सद्गुरूंच्या ‘शब्द’ आणि ‘परा’ या दोन्ही अवस्थांतून शिष्याच्या हृदयावर प्रतिबिंबित होऊ लागते. स्वाभाविकपणे शिष्याला त्या अवस्थाप्राप्तीची तळमळ लागते. वेगाने वाहणार्या पाण्याला केवळ वाट करून द्यावी लागते. ज्या बळाने ती वाट आकारली जाते, त्यालाच ‘गुरुकृपा’ असे म्हणतात.’
– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे
प्रामाणिक प्रयत्न करतो तो शिष्य !
‘गुरूंच्या संकल्पाने शिष्याची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !
भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती असणे
भावामुळे अद्वैतापर्यंतचा प्रवास होतो