त्यागपत्र देऊन आरक्षण मिळणार असेल, तर उद्याच देतो ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यावर मराठा समाज अस्वस्थ आहे. त्यागपत्र देऊन आरक्षण मिळणार असेल, तर उद्याच देतो.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यावर मराठा समाज अस्वस्थ आहे. त्यागपत्र देऊन आरक्षण मिळणार असेल, तर उद्याच देतो.
सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार बाजू मांडण्यास अल्प पडल्याचा आरोप करत मराठा आरक्षणाच्या सूत्रावरून मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे-पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.
पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी देवबाग येथे अडवला मंत्री वडेट्टीवार यांच्या वाहनांचा ताफा
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रहित करून जवळपास १५ दिवस झाले.
कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ल्याने आता आरक्षण मिळवण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, अशी ग्वाही भाजपचे मा. शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे की, मराठा समाजास आरक्षण देण्याची … Read more
‘मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन चालूच रहाणार आहे. यापुढे आणखी आक्रमक आंदोलन केले जाईल’, अशी चेतावणी मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक विनायक भिसे पाटील यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण रहित केले. केंद्र सरकारने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली आहे. राज्य सरकारने अशी याचिका प्रविष्ट केलेली नाही.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात लवकरच पुनर्विचार याचिका प्रविष्ट करणार आहे. यासाठी निवृत्त न्यायाधिशांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल १५ दिवसांत येईल.
मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर काही युवकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी भवनाची तोडफोड केली होती.
वर्ष १९९४ ओबीसी आरक्षणात १८ टक्के वाढ करून तत्कालीन मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुल्या प्रवर्गातील सामाजिक आणि शैक्षणिक सवलत घटनाबाह्य आणि बेकायदेशीररित्या समाविष्ट केली.