मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात संभाजीनगर येथील न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार ! – विनायक मेटे, अध्यक्ष शिवसंग्राम संघटना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण

बीड – सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रहित करून जवळपास १५ दिवस झाले; मात्र आजतागायत सरकारने कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात मराठा समाजाला ‘ई.डब्ल्यू.एस्.’ आरक्षण लागू करा, या मागणीसाठी संभाजीनगर येथील न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.

विनायक मेटे पुढे म्हणाले, ‘‘५ मे या दिवशी मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रहित केले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांसाठी घोषित केलेल्या आरक्षणात मराठा समाजही बसू शकतो. या संदर्भात सरकारकडे मागणी करूनही त्याकडे सरकार लक्ष देण्यास सिद्ध नाही. त्यासाठी आता २५ मे या दिवशी याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे. याचसमवेत मराठा समाजाच्या ज्या मुला-मुलींनी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना तात्काळ नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत.’’