काँग्रेस आणि राष्ट्रवादी भवनाची तोडफोड करणार्‍या ६ युवकांची जामीनावर मुक्तता !

मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर काही युवकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी भवनाची तोडफोड केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांत तक्रार प्रविष्ट !

वर्ष १९९४ ओबीसी आरक्षणात १८ टक्के वाढ करून तत्कालीन मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुल्या प्रवर्गातील सामाजिक आणि शैक्षणिक सवलत घटनाबाह्य आणि बेकायदेशीररित्या समाविष्ट केली.

निकालाच्या समीक्षणासाठी २ दिवसांत कायदेतज्ञांची समिती नियुक्त करणार ! – अशोक चव्हाण, अध्यक्ष, मराठा आरक्षण उपसमिती (मंत्रीमंडळ)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रहित केल्याचे प्रकरण ! समितीच्या अहवालावरून पुनर्विचार याचिकेविषयी निर्णय होणार !

नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही !

समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार केवळ केंद्रशासनाचा आहे. त्यामुळे नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

घटनेत टिकणारे आरक्षण द्या अन्यथा राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटतील ! – मराठा क्रांती मोर्चाची चेतावनी

राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.

मराठा आरक्षणाविषयी भावना तीव्र असल्या, तरी रस्त्यावर उतरून अशांतता निर्माण करू नका ! – दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री

मराठा आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये कुणीही भडक वक्तव्ये करून समाजामध्ये विद्वेष निर्माण करू नये. याविषयी पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही वचनबद्ध ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

गरज भासल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, तसेच आवश्यकता पडल्यास मराठा आरक्षणाबाबत एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून ठराव देखील करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दळणवळण बंदीनंतर बीड येथे मराठा समाजाचा पहिला मोर्चा निघणार !

राज्यभरात मोर्चे काढण्यात येणार !

मनी, मसल अन् पॉलिटिकल पॉवर असलेल्या मराठा समाजाला आरक्षण कशाला हवे ? – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते

एव्हाना सर्वच प्रकारचे आरक्षण संपुष्टात यायला हवे होते मात्र तसे झाले नाही.

मराठा आरक्षण रहित केल्याने सातारा येथे राष्ट्रवादी भवनाची तोडफोड

मराठा आरक्षण रहित केल्याने येथील राष्ट्रवादी भवनाची काचेची तावदाने (खिडक्या) फोडण्यात आली आहेत. तसेच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाबाहेर काही अज्ञात व्यक्तींकडून गोवर्‍या जाळण्यात आल्या आहेत.