२२ लाख रुपये बुडण्याच्या धास्तीने लाडगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकर्‍याची आत्महत्या !

२०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या ‘आदर्श नागरी सहकारी पतसंस्थे’तील आपल्या कुटुंबियांची २२ लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने रामेश्वर इथर (वय ३८ वर्षे) या तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

माधवराव गाडगीळ महाशिवरात्र कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने १८ जुलै ते १४ ऑगस्ट ‘अधिक श्रावण मास संकल्प’ !

माधवराव गाडगीळ महाशिवरात्र कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने १८ जुलै ते १४ ऑगस्ट ‘अधिक श्रावण मास संकल्प’चे आयोजन करण्यात आले आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथे १ लाखाची लाच घेणार्‍या पोलीस अधिकार्‍याला अटक !

फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेणारे पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.

वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोर (जिल्हा पुणे) येथे त्यांना अभिवादन !

वीररत्न बाजीप्रभु देशपांडे, फुलाजीप्रभु देशपांडे, वीर शिवा काशीद आणि बांदल सेनेच्या ३६३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पावनखिंड (कोल्हापूर) ते भोर तालुक्यातील कसबे शिंद गाव असे २५० कि.मी. ज्योत आणून हे अभिवादन केले.

शिवभोजन थाळीचे ९ लाख ५० सहस्र रुपये अनुदान थकीत !

सातारा जिल्हा पुरवठा विभागाने सातारा जिल्हा परिषद उपाहारगृहातील शिवभोजन थाळीचे ९ लाख ५० सहस्र रुपये थकवले आहेत. या अनुदानासाठी उपाहारगृह व्यवस्थापकांनी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे

अखिल भारत हिंदु महासभेच्या कार्यकर्ता मेळाव्यात हिंदुत्वाचे कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार !

‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यालयात १३ जुलैला आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात हिंदुत्वाचे कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

पिंपरी (पुणे) येथील महापालिकेच्या जलतरण तलावांचे खासगीकरण नको ! – सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन

जलतरण तलावांचे दर १० रुपयांवरून २० रुपये केले आहेत. मासिक परवान्याचे दरही वाढवले आहेत. त्यामुळे महापालिकेला दुप्पट उत्पन्न मिळत आहे. तरीही महापालिकेच्या वतीने जलतरणांचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

चातुर्मासाच्या निमित्ताने श्री सांस्कृतिक भवन येथे आज कलश स्थापना ! – विजय पाटील, प्रतिमा विद्या प्रतिष्ठान

१६ जुलैला श्री सांस्कृतिक भवन, आर्.के.नगर येथे दुपारी १ वाजता चातुर्मास कलश स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘प्रतिमा विद्या प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) बसस्थानकाच्या दुरवस्थेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

बसस्थानकाची एवढी दुरवस्था झाल्याचे एस्.टी. महामंडळाला अन्य कुणीतरी का दाखवून द्यावे लागते ? महामंडळ काय करत आहे ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साथरोगांच्या पार्श्वभूमीवर १०३ गावे जोखीमग्रस्त

भातशेतीच्या हंगामात ‘लेप्टोस्पायरोसिस’चा संसर्ग होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.