छत्रपती संभाजीनगर येथे १ लाखाची लाच घेणार्‍या पोलीस अधिकार्‍याला अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीस यंत्रणा !

प्रतीकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेणारे पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. १४ जुलै या दिवशी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास जिन्सी भागात ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे शेख यांनी १३ जुलै या दिवशी गुन्हे शोध (डीबी) पथकाचे दायित्व घेतले होते. जिन्सी पोलीस ठाण्यात प्रविष्ट एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराला १ लाख रुपये मागितले होते. ‘पैसे न दिल्यास तक्रारदारावर गुन्हा नोंद करू’, असे तक्रारदाराला धमकावले होते. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

संपादकीय भूमिका

पोलीस अधिकार्‍यांच्या अशा भ्रष्ट वर्तनामुळे पोलीस यंत्रणा भ्रष्ट होत आहे. अशा पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केल्यावरच इतरांवर जरब बसून भ्रष्टाचार दूर होईल !

पोलीस अधिकार्‍याने लक्षावधी रुपयांची लाच घेणे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकारच होय !