बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली) – ‘ऑनलाईन’ नोंदणीमुळे तालुक्यातील फक्त १३ नागरिकांना आणि तालुक्याबाहेरील ३३४ व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि अन्य जिल्ह्यांतील अनेकांनी येथे येऊन लस घेतली; परंतु त्यातील ५३ नागरिक आलेच नाहीत. त्यामुळे ५० लसी शिल्लक असून ३ लसी वाया गेल्या आहेत. शिल्लक ५० लसींचे काय करायचे याविषयी कोणताही आदेश नाही. यामुळे जर तालुक्यातील नागरिकांना लस मिळत नसेल तर ही ‘ऑनलाईन’ नोंदणी बंद करावी, तसेच नोंदणी करून जे नागरिक येत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.