कणकवली तालुक्यातील शिवगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी
भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील शिवगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतीवृष्टी होण्याचीही शक्यता आहे.