
नाशिक – ‘जर राज्यातील प्रत्येक मंदिरात ‘ठाकरे-पवार’ यांच्या नावाने दानपेटी बसवली, तरच मंदिरे उघडतील का ?’, असा प्रश्न उपस्थित करत भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा सरकारवर मंदिरे न उघडण्याविषयी टीका केली आहे. राज्यभरातील आंदोलनानंतर भाजप आध्यात्मिक आघाडी मंदिरे उघडण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.
मंदिर उघडण्याच्या मागणीवरून तुषार भोसले म्हणाले की, वसुली होते, तिथेच केवळ सवलत मिळते. सरकार मंदिर उघडण्यासाठी नागरिक आणि भक्त यांची अजून किती प्रतीक्षा करणार आहे ? ज्या गोष्टीमध्ये सरकारची वसुली चालू आहे, त्याच गोष्टी सरकार चालू करत आहे. मंदिर उघडण्यासाठी ‘औरंगजेब’ सरकार ‘जिझिया कर’ म्हणून १०-२० रुपये पेटीत टाकले, तरच मंदिरे उघडणार आहेत का ?
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध