एकच गणपति बसवण्याचा स्तुत्य निर्णय घेणार्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! यांचा आदर्श सर्वत्रच्या गणेशोत्सव मंडळांनी घ्यावा ! – संपादक

नीरा (तालुका – पुरंदर) – सरपंच, ग्रामस्थ आणि गावातील विविध गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नीरा दूरक्षेत्राच्या आवारात झालेल्या बैठकीत शहरातील ४८ गणेशोत्सव मंडळांत मिळून पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गणपति बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी या निर्णयाबद्दल गणेशोत्सव मंडळांचे कौतुक केले, तसेच ‘असा चांगला उपक्रम राबवणार्या गणेशोत्सव मंडळांना पोलीस अधीक्षकांकडून सन्मानपत्र देऊ’, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
‘नीट’ परीक्षेच्या वेळी पेडणे केंद्रात अनियमितता
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !