विधान परिषद महायुतीचा विजय : १७ पैकी १६ जागांवर वर्चस्व !

मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. १७ पैकी १६ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला, तर नाशिकमध्ये अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवला.

१. १८ जून या दिवशी झालेल्या मतदानानंतर घोषित झालेल्या निकालात भाजपने लढवलेल्या सर्व ११ जागांवर विजय मिळवला.

२. यापूर्वी ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या ६ मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

पक्षनिहाय निकाल  

• भाजप -११ जागा

• शिवसेना – ३ जागा

• राष्ट्रवादी काँग्रेस – २ जागा

• अपक्ष (भाजप बंडखोर) – १ जागा