पानिपत मराठा शौर्यदिनी हुतात्मा मावळ्यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन !
१४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठा साम्राज्यासाठी शौर्यगाथा मांडणारा दिवस आहे. इतिहासात नोंदवलेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव जरी झाला असला, तरी मराठ्यांचे सामर्थ्य, धाडस आणि शौर्य यांचे दर्शन या दिवशी झाले.