काँग्रेसचा राजकीय अंत आवश्‍यक !

काँग्रेसने यापूर्वी श्रीरामाचे अस्‍तित्‍व नाकारत रामसेतू तोडण्‍याचा घाट घातला. हेही लक्षात घेत हिंदूंच्‍या देवतांच्‍या अवमानाच्‍या विरोधातही कठोर होत त्‍यांच्‍याविषयी अधिकाधिक माहिती शाळा आणि महाविद्यालये यांतून शिकवणे आवश्‍यक आहे. तरच पुढच्‍या पिढीमध्‍ये देवतांविषयी अधिक भाव निर्माण होईल.

गदारोळामुळे संसदेचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित !

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये लोकशाहीचा अवमान करणारे विधान केल्याच्या प्रकरणी क्षमा मागावी, अशी मागणी लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या खादारांकडून करण्यात आल्याने त्याला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला.

(म्हणे) ‘केवळ भारतीय लोकशाहीविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले; म्हणून मला देशद्रोही म्हणता येणार नाही !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

‘काँग्रेसच्या लोकांमध्ये देशद्रोह इतका ठासून भरला आहे की, त्यांना विदेशात जाऊन देशाचा अवमान करणे, हाही देशद्रोह वाटत नाही’, हे यावरून लक्षात येते !

राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलावे ! – रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

राहुल गांधी यांच्या लंडन येथील विधानांविषयी काही बोलण्याची आवश्यकता नाही. मी त्यांना इतकेच सांगीन की, राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलले पाहिजे. वास्तव काय आहे ?, हेही त्यांनी पाहिले पाहिजे.

आम्हाला बाबरी नाही, तर श्रीरामजन्मभूमीची आवश्यकता ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आम्हाला आता बाबरी मशिदीची आवश्यकता नाही. आम्हाला आता श्रीरामजन्मभूमी पाहिजे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथे प्रसारसभेत केले. कर्नाटक राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून प्रचारास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री सरमा बोलत होते.

लंडनमधील राहुल गांधी यांच्या विधानावरून संसदेत गदारोळ !

संसदेचे कामकाज गदारोळ न होता झाले, असा एकतरी दिवस गेला आहे का ? याला उत्तरदायी असणार्‍यांना ज्या प्रमाणे शाळेत वर्गातून बाहेर काढले जाते, तसे बाहेर का काढले जात नाही ?

भारताची अपकीर्ती करणार्‍या राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे !

”दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन यांच्यात आणि राहुल गांधी यांच्यात काय फरक आहे ? ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची भूमिका आणि आताची राहुल गांधी यांची भूमिका एकच आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत हे सिद्ध होते.”

‘गांधी’ यांचे करायचे काय ?

राहुल गांधी यांच्‍या वैचारिक गोंधळामुळे भारताची नव्‍हे, तर काँग्रेसचीच जगात नाचक्‍की होत आहे, हे ती लक्षात घेईल का ?

(म्हणे) ‘भारताच्या संसदेत विरोधी पक्षनेत्यांचे ध्वनीक्षेपक बंद केले जातात !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

जगभरात भारताची प्रतिमा मलीन करणार्‍या अशा लोकांमध्ये ‘राष्ट्रभक्ती किती आहे ?’ हे स्पष्ट होते ! अशी मानसिकता असलेल्या लोकांचा भरणा असलेल्या काँग्रेस पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य करणे, हे भारतियांसाठी दुर्दैवी आहे !

राहुल गांधी यांचे आतंकवाद्यांशी संबंध !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे केंब्रिज, इंग्लंड येथे झालेले व्याख्यान हे ‘मेड इन चायना’ (चीनने तयार केलेले) असल्याचे भासते. चीनचे कौतुक आणि भारतावर टीका करणारे भाषण म्हणजे भारतीय लोकशाहीवरील एक आक्रमण !