गदारोळामुळे संसदेचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित !

नवी देहली – राहुल गांधी यांनी लंडनमध्ये लोकशाहीचा अवमान करणारे विधान केल्याच्या प्रकरणी क्षमा मागावी, अशी मागणी लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या खादारांकडून करण्यात आल्याने त्याला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला. यामुळे झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. राज्यसभेतही गदारोळ झाल्याने तीही दुसारपर्यंत स्थगित करण्यात आली.

कोट्यवधी रुपयांचा चुराडा !

१. संसदेच्या एका मिनिटासाठी एका निष्कर्षानुसार २९ सहस्र रुपये ते १ लाख ८३ सहस्र रुपये खर्च येतो.

२. एका घंट्यासाठी साधारण १७ लाख ४० सहस्र ते १ कोटी १० लाख रुपये खर्च येतो.

३. एका दिवसात १ कोटी ९१ लाख ते १२ कोटी रुपये खर्च येतो.