हास्यास्पद साम्यवाद !

‘जनतेचे शिक्षण, आरोग्य, आवडी-निवडी यांतही साम्यवादी साम्यवाद आणू शकत नाहीत, असे असतांना ते राष्ट्रात साम्यवाद काय आणणार ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले     

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय पक्ष  ‘हे  देऊ,  ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी आणि शेवटी दुःखी बनवतात. याउलट साधना हळूहळू सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंदाची, ईश्‍वराची प्राप्ती कशी करायची, हे शिकवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक  शिक्षणप्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

कुठे कुटुंबाचे किंवा आपल्या जातीबांधवांचे हित पहाणारे संकुचित वृत्तीचे मानव, तर कुठे अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्राणीमात्रांचे हित सांभाळणारा ईश्‍वर !- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

आमच्या पिढीने वर्ष १९७० पर्यंत सात्त्विकता अनुभवली; पण पुढच्या पिढ्यांनी वर्ष २०१८ पर्यंत ती अल्प प्रमाणात अनुभवली आणि वर्ष २०२३ पर्यंत अनुभवणार नाहीत. त्यानंतरच्या पिढ्या हिंदु राष्ट्रात सात्त्विकता पुन्हा अनुभवतील ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?, असा प्रश्‍न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, नालंदा आणि तक्षशिला विश्‍वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?, हेही शिकवले जाईल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘प्रवचने, व्याख्याने आणि चालू विषयावरील ग्रंथ-लिखाण यांत ज्यांचे जीवन जाते, त्यांचे नाव आणि कार्य ते जिवंत असेपर्यंत असते. याउलट जे संशोधन करतात त्यांचे नाव आणि कार्य पुढच्या अनेक पिढ्यांनाही ज्ञात होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले