पुणे येथील वारजे पुलाखाली नदीपात्रात महापालिकेचा शेकडो ट्रक माती आणि राडारोडा !

श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते असे म्हणून विसर्जनासाठी ‘कृत्रिम हौद’ बांधणार्‍या पुणे महापालिकेचा हिंदुद्वेष्टेपणा ! भाविकांनीच याचा जाब पालिकेला विचारायला हवा आणि दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करावा !

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या जनजागृतीसाठी २६२ उच्चशिक्षण संस्थांमधील ७२१ विद्यार्थ्यांची निवड !

निवडलेल्या विद्यार्थी स्वयंसेवकांची सूची विद्यापीठ अनुदान आयोगाने घोषित केली आहे.

पिंपरी (पुणे) येथील ‘ग.दि.मा. नाट्यगृहा’त नाटकाचा एकही प्रयोग नाही !

जनतेच्‍या कराचा पैसा अशा पद्धतीने वाया घालवण्‍याचा महापालिकेला काय अधिकार आहे ? असे निर्णय घेण्‍याआधी सूचना, हरकती घेतल्‍या होत्‍या का ?

पुणे येथे विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांच्‍या हस्‍ते ‘कार्बन न्यूट्रॅलिटी सुविधा कक्षा’चे उद़्‍घाटन !

‘कार्बन न्यूट्रॅलिटी’ म्‍हणजे कार्बन डायऑक्‍साईडचे वातावरणात उत्‍सर्जन होण्‍याचे प्रमाण आणि वातावरणातून कार्बन डायऑक्‍साईड काढून टाकण्‍याचे प्रमाण यांचे योग्‍य संतुलन साधून निव्‍वळ शून्‍य कर्बभार साध्‍य करणे.

पुणे येथे दहीहंडी उत्‍सवात अनधिकृत ‘होर्डिंग्‍ज’ लावल्‍यामुळे उद्योजक पुनीत बालन यांना ३ कोटी २० लाख रुपयांचा दंड !

बालन यांनी पुण्‍यातील गणेशोत्‍सव मंडळांना प्रचंड प्रमाणात देणग्‍या दिल्‍याने गणेशोत्‍सव आणि दहीहंडी यांच्‍या काळात पुनीत बालन अन् त्‍यांच्‍या ‘मिनरल वॉटर ब्रॅण्‍ड’चे संपूर्ण शहरात ‘होर्डिग्‍ज’ लावण्‍यात आले होते….

पुण्‍याच्‍या पालकमंत्रीपदी अजित पवार, तर कोल्‍हापूरच्‍या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ !

उच्‍च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर अन् अमरावती, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्‍हापूरचे पालकमंत्रीपद देण्‍यात आले आहे.

पाषाण (पुणे) येथे ७०० किलो भेसळयुक्‍त तुपासह एकास अटक !

अन्‍न पदार्थांमध्‍ये भेसळ करणार्‍यांना कठोर शिक्षा न झाल्‍याचा परिणाम !

पुणे जिल्‍हा परिषदेने केलेल्‍या माध्‍यमिक शाळांच्‍या मूल्‍यांकनामध्‍ये ६१३ शाळा ‘नापास’ !

शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुण्‍यात शेकडो शाळा मूल्‍यांकनामध्‍ये अनुत्तीर्ण होणे, हे शिक्षण विभागाला लज्‍जास्‍पद !

पुणे येथे रस्‍त्‍यावर उभारलेले मंडप न काढणार्‍या मंडळांना क्षेत्रीय कार्यालयांकडून नोटीस !

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्‍त माधव जगताप म्‍हणाले की, ‘‘२२ मंडळांनी रनिंग (रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला खांब उभे करून त्‍यावर रंगीत झालर (कापड) लावणे) मंडप काढण्‍यास विलंब केल्‍याने महापालिकेने त्‍यावर कारवाई केली आहे.

लोणावळा (जिल्‍हा पुणे) येथे पर्यटक अल्‍पवयीन मुलींचे अपहरण करून सामूहिक बलात्‍कार !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात अशा घटना घडणे लज्‍जास्‍पद आहे ! यातून पोलिसांचा गुन्‍हेगारांना काहीच धाक उरला नाही, हे सिद्ध होते.