मंगळुरू (कर्नाटक) येथे पी.एफ्.आय.च्या ठिकाणांवर धाडी : ५ जण कह्यात !

१३ ऑक्टोबर या दिवशी कर्नाटकातील मंगळुरू येथे काही ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) धाडी टाकण्यात आल्या.

नेपाळ सीमेवरील मदरशांमध्ये घुसखोरी करण्याचा बांगलादेशी आतंकवाद्यांचा प्रयत्न

‘जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जे.एम्.बी.)’ या आतंकवादी संघटनेचे आतंकवादी नेपाळ सीमेजवळ असलेल्या मदरशांद्वारे भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत शांतता बिघडण्याच्या शक्यतेने ऐन दिवाळीत जमावबंदी लागू  !

केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना प्रत्येक वेळी हिंदूंंना आतंकवादाच्या सावटाखाली सण साजरे करावे लागणे, हे कितपत योग्य आहे ?

मद्यधुंद सुदामा श्रीकृष्णाला दारू देतांना दाखवले !

देहलीतील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून श्रीकृष्ण आणि सुदामा यांचा अश्‍लाघ्य अवमान !

काशीपूर (उत्तराखंड) येथे खाण माफियाला पकडण्यास गेलेल्या उत्तरप्रदेश पोलिसांवर गोळीबार

५ पोलीस घायाळ, तर एका महिलेचा मृत्यू
गावकर्‍यांनी पोलिसांनाच ठेवले ओलीस !

कर्नाटकमधील हिजाब बंदीचे प्रकरण आता सरन्यायाधिशांकडे !

कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘सरकारी प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेज, उडुपी’च्या काही मुसलमान विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.

देहली दंगलीच्या वेळी गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍याची हत्या करणार्‍या मुसलमानाला अटक

त्याच्यावर यापूर्वीच अपहरण आणि बलात्कार असे गुन्हे आहेत. या प्रकरणी त्याला यापूर्वी अटकही करण्यात आली होती.

एखाद्या महिलेने उत्तान कपडे घातले, तरीसुद्धा पुरुषांना गैरवर्तवणुकीचा परवाना मिळत नाही ! – केरळ उच्च न्यायालय

लैंगिक छळ प्रकरणात लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिविक चंद्रन् यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला आव्हान देणार्‍या याचिका निकाली काढतांना उच्च न्यायालयाने वरील मत व्यक्त केले.

पंजाबमध्ये बंदीवानांना त्यांच्या जोडीदाराशी एकांतात भेटता येणार !

पंजाब सरकारने सांगितले की, ही सुविधा कुख्यात गुंड आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित खटल्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या दोषींना मिळणार नाही.

आम आदमी पक्षाचे नेते गोपाल इटालिया यांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे प्रकरण