काशीपूर (उत्तराखंड) येथे खाण माफियाला पकडण्यास गेलेल्या उत्तरप्रदेश पोलिसांवर गोळीबार

  • ५ पोलीस घायाळ, तर एका महिलेचा मृत्यू

  • गावकर्‍यांनी पोलिसांनाच ठेवले ओलीस !

काशीपूर (उत्तराखंड) – येथे १२ ऑक्टोबरच्या रात्री खाण माफिया जफर याला  पकडण्यास गेलेल्या उत्तरप्रदेश पोलिसांवर आक्रमण करण्यात आले, तसेच या वेळी गोळीबारही करण्यात आला. यात ५ पोलीस घायाळ, तर २ पोलीस बेपत्ता आहेत. या गोळीबारात भाजपच्या नेत्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. या प्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी उत्तरप्रदेश पोलिसांच्या १२ पोलीस कर्मचार्‍यांवर हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

उधमसिंह नगरातील मुरादाबादमध्ये ही घटना घडली. ५० सहस्र रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलेल्या जफर याला पकडण्यासाठी उत्तरप्रदेश पोलीस तेथे गेले होते. त्या वेळी स्थानिकांनी पोलिसांचा विरोध केला. या वेळी झालेल्या गोळीबारात ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे, त्या भाजपचे नेते गुरताज भुल्लर यांच्या पत्नी गुरप्रीत कौर होत्या. जफर भुल्लर यांच्या घरात लपल्याचा पोलिसांना संशय होता. गुरप्रीत यांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी ४ पोलीस कर्मचार्‍यांना ओलीस ठेवले.

संपादकीय भूमिका

पोलिसांवर गोळीबार करण्याचे धाडस होतेच कसे ?