मद्यधुंद सुदामा श्रीकृष्णाला दारू देतांना दाखवले !

  • देहलीतील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून श्रीकृष्ण आणि सुदामा यांचा अश्‍लाघ्य अवमान !

  • कार्यक्रमाच्या आयोजकांची क्षमायाचना !

नवी देहली – येथील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये श्रीकृष्ण भक्त सुदामा यांना दारुड्या म्हणून दाखवून सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण यांची खिल्ली उडवली आहे. या व्हिडिओमध्ये मद्यधुंद सुदामा श्रीकृष्णाला दारू देतांना दाखवले आहे. लेखक अन्शुल याने प्रसारित केलेल्या ४४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये ‘अरे द्वारपालों, कन्हैया को कह दो’, हे गाणे पार्श्‍वसंगीत म्हणून वाजवले आहे. हा व्हिडिओ ९ ऑक्टोबर २०२२ या दिवशी या महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाचा आहे. या व्हिडिओला विरोध होत असल्याचे समजताच कार्यक्रम सादर करणार्‍यांनी क्षमायाचना केली आहे.

१. या व्हिडिओमध्ये मंचावर कार्यक्रम सादर करणार्‍या एका मुलीला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवले आहे. पडद्याच्या उजवीकडून एक अभिनेता सुदाम्याच्या भूमिकेत मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करतांना दाखवले आहे. तो थेट बाटलीतून दारू पीत असल्याचे दाखवले आहे. त्यानंतर तो श्रीकृष्णाकडे जातो आणि त्याला त्याच्या बाटलीतून दारू प्यायला देतो. त्यावर उपस्थित प्रेक्षकांना जल्लोष करतांना दाखवले आहे.

२. मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘निवासी डॉक्टर्स असोसिएशन’ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रकरणी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या विडंबनात्मक कार्यक्रमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे लक्षात आले. यानंतर कार्यक्रम सादर करणार्‍या ‘माहोल मेकर्स’च्या सभासदांना बोलावून त्यांच्याकडून लिखित स्वरूपात क्षमायाचना घेण्यात आली, तसेच ‘माहोल मेकर्स’वर यापुढे महाविद्यालयाच्या उत्सवात कार्यक्रम सादर करण्याला बंदी घालण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • केवळ क्षमायाचनेवर समाधान न मानता हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्यास कुणी धजावणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण केली पाहिजे !
  • मुसलमान त्यांच्या धर्माच्या संदर्भात कुणी अवमान केला, तर थेट शिरच्छेद करण्याची धमकी देऊन त्यानुसार कृतीही करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या वाटेला कुणी जात नाहीत, तर हिंदू साधा वैध मार्गानेही निषेध करण्यासाठी पुढे येत नाहीत !