नेपाळ सीमेवरील मदरशांमध्ये घुसखोरी करण्याचा बांगलादेशी आतंकवाद्यांचा प्रयत्न

श्री दुर्गादेवी मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवरील आक्रमणामागे मदरशातील विद्यार्थी !

प्रतीकात्मक छायाचित्र

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सध्या उत्तरप्रदेशमध्ये मदरशांचे सर्वेक्षण चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जे.एम्.बी.)’ या आतंकवादी संघटनेचे आतंकवादी नेपाळ सीमेजवळ असलेल्या मदरशांद्वारे भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती समोर आली आहे.

नुकतीच राज्यातील सुलतानपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी झालेल्या हिंसाचारामागे एका मदरशाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. ‘मिरवणुकीवर आक्रमण करणारे मदरशातील विद्यार्थी आहेत’, असे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. या आक्रमणाची सिद्धता पूर्वीच करण्यात आली होती. त्यासाठी दगड आणि विटा गोळा करण्यात आल्या होत्या. नियोजनानुसार आक्रमणापूर्वी वीज बंद करण्यात आली होती. या वेळी मदरशाच्या मौलानाने (मुसलमानांचा धार्मिक नेता) मुसलमानांना आक्रमणासाठी भडकावल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

संपादकीय भूमिका

  • आतातरी सरकार देशातील मदरसे बंद करणार का ?