देहली दंगलीच्या वेळी गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍याची हत्या करणार्‍या मुसलमानाला अटक

नवी देहली – येथे २ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीच्या वेळी गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुंतजिम उपाख्य मुसा कुरेशी याला तेलंगाणा राज्यातून अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीच अपहरण आणि बलात्कार असे गुन्हे आहेत. या प्रकरणी त्याला यापूर्वी अटकही करण्यात आली होती. (या दोन्ही प्रकरणांत मुसा कुरेशी याला कठोर शासन न झाल्याचाच परिणाम ! – संपादक)

शर्मा यांच्या हत्येच्या प्रकरणी यापूर्वीच आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन यांना अटक करण्यात आलेली आहे. शर्मा यांच्यावर ५२ हून अधिक चाकूचे वार करण्यात आले होते. त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह एका नाल्यामध्ये फेकण्यात आला होता.