केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्‍वर येथे अटक : जाणून घ्या सर्व घडामोडी…

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

आमचे प्रश्न सुटले नाहीत, तर नितीन राऊत यांचे त्यागपत्र मागू ! – भाई जगताप, मुंबई अध्यक्ष, काँग्रेस

स्वपक्षाचे मंत्री असूनही काँग्रेसच्या नेत्यांना आंदोलन करावे लागणे, याला काँग्रेसमधील दुही म्हणायची कि आंदोलननाट्य !

अनिल देशमुख यांच्या सहकार्‍यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडून आरोपपत्र प्रविष्ट !

शिंदे आणि पालांडे यांच्या समवेत अनिल देशमुख यांची चौकशी करायची असल्याचे न्यायालयात सांगून अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांना चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी समन्स पाठवला आहे.

पुढील निवडणुका स्वबळावरच लढू ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

राज्यातील सरकार किती वेळ चालेल ठाऊक नाही; पण या सरकारमुळे जे दुखावले गेले आहेत, त्यांना आम्ही निश्चित न्याय देऊ…

गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांप्रमाणे महाविकास आघाडी सत्तेला चिकटली आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘सत्तेचा वाटा मिळाला नाही की ओरड होते. वाटा मिळाला की, सगळे बंडोबा थंडोबा होतात.

मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍याचा उपचार चालू असतांना मृत्यू !

मानसिक ताण सहन न झाल्याने होणार्‍या आत्महत्यांचे वाढते प्रमाण पहाता आत्महत्या टाळण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे, हे अधोरेखित करणारी घटना !

राज्य सरकारकडून दहीहंडीसाठी अनुमती नाही !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, एकदा अनुमती दिली आणि कोरोनाचा संसर्ग वाढला, तर उत्सव आणि संस्कृती यांना गालबोट लागेल. आम्ही गोविंदा पथकांवर कसे लक्ष ठेवणार ?

चौकशीची मागणी करण्याऐवजी रश्मी शुक्ला यांची गुन्हा रहित करण्याची मागणी कशासाठी ?

राज्यातील ‘फोन टॅपिंग’विषयीचा अहवाल आणि त्याविषयीची माहिती संवेदनशील असल्याचे भारतीय पोलीस दलाच्या अधिकारी रश्मी शुक्ला यांनी स्वत: मान्य केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या दापोली येथील बंगल्यासह अन्य बांधकामांवर प्रशासनाकडून कारवाई !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अवैध असल्याची तक्रार केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केली होती. या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात येत आहे.

मालकाने केलेल्या छळामुळे पतीने आत्महत्या केल्याचा आरोप !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर असे प्रकार घडणे देशासाठी चिंताजनक !