युती सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील ६ सहस्र ५०० कोटींच्या कामांच्या चौकशीचे आदेश !

महावितरणचे संचालक वित्त रवींद्र सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीसाठी सहा सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचा प्रस्तावित ‘शक्ती कायदा’ २ वर्षांनंतरही प्रतीक्षेत !

महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी आंध्रप्रदेशमधील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा करण्याची घोषणा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्ष २०१९ मधील हिवाळी अधिवेशनात केली होती. प्रत्यक्षात वर्ष २०२१ चे हिवाळी अधिवेशन तोंडावर आले असतांनाही या कायदा प्रतीक्षेत आहे.

मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांना मोठ्या पदावर बसवले ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना त्यांनी हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादव याला ‘बांधकाम कामगार मंडळा’चे अध्यक्ष केले. असे आरोप अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले.

खंडणी प्रकरणी आणखी दोन पोलीस अधिकारी अटकेत !

विकासक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणी वसुलीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एस्.टी. कर्मचार्‍यांचा संप अवैध ! – परिवहनमंत्री

मनसे एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपात सहभागी होणार !

कोलकाता उच्च न्यायालयात प्रलंबित आहे देशातील सर्वांत जुना, म्हणजे २२१ वर्षांपूर्वीचा न्यायालयीन खटला !

सरकारी सर्वेक्षणानुसार सर्व खटले निकाली निघण्यासाठी लागतील ३२४ वर्षे !

तुमची मेहुणी अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेली आहे का ?

नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांना ‘ट्वीट’द्वारे प्रश्न !

‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील पार्टीचे निमंत्रण मिळाले होते ! – पालकमंत्री अस्लम शेख

गुजरातमध्ये २० सहस्र कोटींपेक्षा अधिक रकमेचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले; पण त्याची चर्चा न होता आर्यन खान प्रकरणाचाच गाजावाजा झाला आहे’, असेही ते म्हणाले.

मागण्यांवर ठोस निर्णय मिळेपर्यंत संप चालू ठेवणार ! – एस्.टी. कामगार संघटना

‘संप करणे म्हणजे राष्ट्रहानी’ हे वास्तव लक्षात घेऊन एस्.टी. कामगार संघटनांनी मागण्या मान्य होण्यासाठी वैध मार्ग अवलंबायला हवा !

हर्षदा रेडकर यांच्यावरील खटल्याशी माझा काहीही संबंध नाही !

अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे प्रत्युत्तर