मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा दापोली येथील मुरुड समुद्रकिनार्यावरील बंगला, तसेच आजूबाजूची अन्य बांधकामे ‘सीआर्झेड’ कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याने प्रशासनाकडून ती तोडण्यात येत आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अवैध असल्याची तक्रार केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केली होती. या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात येत आहे. याविषयी किरीट सोमय्या यांनी ‘करून दाखवले. पुढचा क्रमांक मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा आहे. उद्या मी दापोली येथे जाऊन तोडकामाची पहाणी करणार आहे’, असे ‘ट्वीट’ केले आहे.