बॉलीवूडवाले क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत मुसलमानधार्जिण्‍या चित्रपटांवर बहिष्‍कार चालूच ठेवा ! – तान्‍या, संपादिका, ‘संगम टॉक्‍स’ यू ट्यूब वाहिनी

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘लव्‍ह जिहादमध्‍ये बॉलीवूडची साथ’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – गेली काही वर्षे इस्‍लामला महत्त्व देणारे आणि हिंदु धर्मविरोधी चित्रपट बनवले जात आहेत. नायक मुसलमानधार्जिणा, तर हिंदूंना खलनायक दाखवले जाते. एवढेच नव्‍हे, तर चित्रपटांतून ‘लव्‍ह जिहाद’ला प्रोत्‍साहन दिले जात आहे; पण आता हिंदू जागृत होऊन अशा चित्रपटांवर बहिष्‍कार घालत असल्‍याने बॉलीवूडची आर्थिक हानी होत आहे. अशा वेळी सुनील शेट्टीसारख्‍या हिंदू अभिनेत्‍याला पुढे करून सारवासारव करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे; पण अजूनही बॉलीवूडवाले क्षमा मागायला सिद्ध नाहीत. यात मोठ्या प्रमाणात पैशांचा खेळ आहे.

तान्या

बॉलीवूडने त्‍यांना पैसे पुरवणारी जी टोळी आहे, त्‍यांना आपले मायबाप मानले आहे. प्रत्‍यक्षात ते ‘प्रेक्षक मायबाप आहेत’, हे विसरले आहेत; म्‍हणूनच याची जोपर्यंत त्‍यांना जाणीव होत नाही, तसेच ते क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत मुसलमानधार्जिण्‍या चित्रपटांवरचा बहिष्‍कार चालू ठेवला पाहिजे, असे आवाहन ‘संगम टॉक्‍स’च्‍या संपादिका तान्‍या यांनी केले आहे. हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘लव्‍ह जिहादमध्‍ये बॉलीवूडची साथ !’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्‍या बोलत होत्‍या.

‘लव्‍ह जिहाद’ हे हिंदु मुलींना न समजणारे धर्मांतराचे मोठे षड्‍यंत्र ! – सौ. रती हेगडे, लेखक, स्‍तंभलेखक आणि संशोधक

सौ. रती हेगडे

‘बॉलीवूडचे सिनेमे आणि वेब सिरीज यांतून विवाहपूर्व अन् विवाहबाह्य शारीरिक संबंध हे सामान्‍य आहेत’, असे दाखवले जात आहे. हिंदु धर्मातील पंडित, संस्‍कार, परंपरा या जुनाट आणि बुरसटलेल्‍या आहेत, तर इतर पंथातील धार्मिक कृती पवित्र असून त्‍यांचे धर्मगुरु उदात्त विचारसरणीचे आहेत, असेही दाखवले जाते. तसेच ‘हिंदु मुलीचे मुसलमान मुलाशी संबंध हे खरे आदर्श प्रेम आहे आणि केवळ हीच मुले आपला सन्‍मान करण्‍यासह आपल्‍याला स्‍वातंत्र्य देऊ शकतात’, असे दर्शवले जाते. प्रत्‍यक्षात मात्र हे धर्मांतराचे मोठे षड्‍यंत्र आहे, जे हिंदु मुलींना समजत नाही. त्‍यामुळे त्‍या ‘लव्‍ह जिहाद’च्‍या जाळ्‍यात अडकतात.


हे पहा –

विशेष संवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की

#लवजिहाद में बाॅलीवुड का साथ !

@ratihegde
@TanyaBrahmvadni
@sangamtalks
@Anand_J25

________________________________________ 

सारवासारव करणार्‍यांनी ‘लव्‍ह जिहाद’ला खतपाणी घालणार्‍या चित्रपटांच्‍या विरुद्ध आवाज का उठवला नाही ? – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

श्री. आनंद जाखोटिया

केवळ चित्रपटच नव्‍हे, तर जी विज्ञापने दाखवली जातात, त्‍यातून ‘अनेक हिंदु प्रथा-परंपरांवर आघात केले जातात, तसेच जुन्‍या परंपरांविषयी न्‍यूनगंड निर्माण करून त्‍या पालटण्‍याची वेळ आली आहे’, असा संदेश दिला जातो. सुनील शेट्टी ‘सर्व बॉलीवूडवाले वाईट नाहीत’, असे म्‍हणतात; पण ज्‍या वेळी ‘लव्‍ह जिहाद’ला खतपाणी घालणारे चित्रपट किंवा विज्ञापने आली, त्‍याविरुद्ध त्‍यांनी आवाज का उठवला नाही ? आज जेव्‍हा बॉलीवूडवर टीका होत आहे, तेव्‍हा हिंदूंचा आवाज दाबण्‍यासाठी का पुढे आला ? त्‍यांना केवळ व्‍यवसाय आणि पैसे यांच्‍या पुढे देश अन् धर्म यांविषयी काहीच वाटत नाही.


संपादकीय भुमिका

हिंदु प्रथा-परंपरांना बुरसटलेल्‍या म्‍हणत चित्रपट काढणारे अन्‍य धर्मियांच्‍या परंपरांवर चित्रपट काढण्‍याचे धाडस करतील का ?