मुंबई-पुणे महामार्गावर ४० सहस्र ९०९ वाहनांवर कारवाई !

आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

मानखुर्द (मुंबई) येथे शेजारी रहाणार्‍या सराईत गुंडाने महिलेला गोळी घालून मारले !

मानखुर्द येथील मंडाळा भागातील चाळीतील शेजार्‍यांच्‍या भांडणात ३१ वर्षीय फरजाना इरफान शेख हिच्‍यावर गोळीबार करण्‍यात आला आणि त्‍यात तिचा मृत्‍यू झाला.

विदर्भ आणि मराठवाडा येथे गारपिटीची शक्‍यता

महाराष्‍ट्रात मागच्‍या काही दिवसांपासून पाऊस थैमान घालत आहे. दरम्‍यान सध्‍या पुढचे दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे, पाऊस, गारपीट होण्‍याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी !

मुंबईकडून पुण्‍याच्‍या दिशेने १० कि.मी.पर्यंत रांगा लागल्‍या आहेत. खोपोलीपासून ते खंडाळ्‍यापर्यंत या रांगा लागल्‍या आहेत. एका चारचाकी गाडीला आग लागल्‍याने ती जळून खाक झाली आहे.

नवी मुंबईत पाणी कपातीला प्रारंभ

या वर्षी पाऊस विलंबाने येणार असल्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात २८ एप्रिलपासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.

रस्ते काँक्रिटीकरणाचे ६ कोटी रुपये खर्चाचे काम चालू; एका वर्षात तुर्भेगाव खड्डामुक्त होणार ! – रामचंद्र घरत, जिल्हाध्यक्ष, भाजप

तुर्भे गावातील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला आहे. या रस्ते काँक्रिटीकरणामुळे एका वर्षात तुर्भेगाव खड्डामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नास्तिकतावाद्यांच्या हत्येच्या भरकटलेल्या अन्वेषणाची पोलखोल !

मागील काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम्.एम्. कलबुर्गी या नास्तिकतावाद्यांच्या गोळ्या घालून हत्या झाल्या. या चारही प्रकरणांत तपासयंत्रणांनी ज्या प्रकारे तपास केला, त्यात कुठेही ताळमेळ आणि तर्क दिसला नाही. उलट हा तपास भरकटला होता.

मुंबईमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमात अमित शहा यांची उपस्थिती, ५ सहस्रांहून अधिक ठिकाणी प्रक्षेपण !

विलेपार्ले येथील घैसास सभागृहात हा कार्यक्रम झाला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अन्य मंत्री, भाजपचे नेते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले  होते.

आधी मुली गायब झाल्याविषयी चर्चा करा आणि नंतर त्यांच्या आकडेवारीविषयी बोला ! – अभिनेत्री अदा शर्मा

आमचा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही; पण त्यात आतंकवादी संघटनांविषयी निश्‍चितच भाष्य केले आहे.

ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, तसेच विद्यार्थी यांना मुंबई मेट्रोत २५ टक्के सवलत !

१ मेपासून म्हणजेच महाराष्ट्रदिनापासून त्यांना २५ टक्के सवलत मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी केली आहे.