आधी मुली गायब झाल्याविषयी चर्चा करा आणि नंतर त्यांच्या आकडेवारीविषयी बोला ! – अभिनेत्री अदा शर्मा

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला होणार्‍या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर अभिनेत्री अदा शर्मा यांचे आवाहन

अभिनेत्री अदा शर्मा

मुंबई – आमचा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही; पण त्यात आतंकवादी संघटनांविषयी निश्‍चितच भाष्य केले आहे. आमच्या चित्रपटात मुलींवर अत्याचार, अमली पदार्थांचे सेवन, बुद्धीभेद, बलात्कार, मानवी तस्करी आणि लोकांकडून वारंवार बलात्कार अन् बळजोरीने केली जाणारी गर्भधारणा, तसेच बाळाला जन्म दिल्यावर ते  हिरावून घेतले जाणे आणि नंतर त्याला आत्मघाती बनवले जाणे, अशा गंभीर समस्यांविषयी भाष्य केले आहे. असे असतांनाही काही जण ‘हा अपप्रचार आहे’, असे म्हणत आहेत किंवा गायब झालेल्या मुलींच्या आकडेवारीविषयी चर्चा करत असेल, असे करण्यापेक्षा आधी मुली गायब झाल्या आहेत, यावर चर्चा करा अन् नंतर आकडेवारीविषयी बोला, असे विधान ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये केलेे आहे. ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट ५ मे या दिवशी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वीच या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्या बोलत होत्या.