राज ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली !

या भेटीविषयी अद्याप एकनाथ शिंदे किंवा राज ठाकरे यांच्‍याकडून अधिकृतपणे वाच्‍यता करण्‍यात आलेली नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्‍यास शिवसेनेला अडचण येऊ शकते, अशी चर्चा आहे.

लोक मुसलमानांच्या भेदभावाविषयी का बोलतात ?, हा प्रश्‍न पडतो ! – हुमा कुरेशी, अभिनेत्री

हुमा कुरेशी यांच्या वक्तव्याविषयी ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे सांगणार्‍यांना काय म्हणायचे आहे ?

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट !

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ६ जुलै या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची दैनिक ‘सामना’च्‍या कार्यालयात भेट घेतली. तत्‍पूर्वी त्‍यांनी गाडीने एकत्र प्रवास केला.

अजित पवार मुख्‍यमंत्री होणार असल्‍याच्‍या अफवा यशस्‍वी होणार नाहीत ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

जितदादा सरकारमध्‍ये सहभागी झाल्‍यानंतर ते मुख्‍यमंत्री होणार आहेत, असे कोण पिकवत आहे, त्‍यांचे मनसुबे यशस्‍वी होणार नाहीत, असे मत राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ६ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

शरद पवार गटाच्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांचे निलंबन !

शरद पवार गटाच्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्‍या कार्यकारिणीची बैठक ६ जुलै या दिवशी देहली येथे झाली. या बैठकीमध्‍ये राष्‍ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित करण्‍यात आले आहे.

अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्‍यास शिवसेनेच्‍या आमदारांचा विरोध !

शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांसह भाजपच्‍या ६ आमदारांनी अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्‍यास विरोध दर्शवला आहे.

परशुराम घाटात करण्यात येत आहे महामार्गावर पडलेल्या भेगांची दुरुस्ती

‘या महामार्गावर पडलेल्या भेगा सिमेंटने भरण्यात येत आहेत. या मार्गावर  काँक्रिटिकरणास आवश्यक असलेला १४ दिवसांचा कालावधी मिळाला नसतांना या मार्गावरील वाहतूक चालू करण्यात आली होती.

मी त्यागपत्र देणार ही अफवा ! – मुख्यमंत्री

मी त्यागपत्र देणार आहे, ही अफवा आहे. विरोधकांकडून ती पसरवली जात आहे. सर्वसामान्य घरातील माणूस मुख्यमंत्री झाला, ही विरोधकांची पोटदुखी आहे. सरकारच्या शपथविधीपासून ते ‘सरकार पडेल’ असे म्हणत आहेत.

(म्‍हणे) ‘राष्‍ट्रप्रेमी नसलेल्‍यांसमवेत जाणार नाही !’ – शरद पवार, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

दंगल घडवून राजकीय लाभ घेण्‍याचा भाजपचा प्रयत्न आहे. राष्‍ट्रीय ऐक्‍याला तडा देणारे राष्‍ट्रप्रेमी असू शकत नाहीत. राष्‍ट्रप्रेमी नाहीत, त्‍यांच्‍यासमवेत जाणार नाही, अशी भूमिका राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवार यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या बैठकीत घेतली.

‘हरित हायड्रोजन’चेे धोरण घोषित करणारे महाराष्‍ट्र देशातील पहिले राज्‍य, मंत्रीमंडळाची मान्‍यता !

४ जुलै या दिवशी झालेल्‍या राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत या प्रकल्‍पाला मान्‍यता देण्‍यात आली असून त्‍यासाठी ८ सहस्र ५६२ कोटी रुपये इतका निधी संमत करण्‍यात आला आहे.