आतंकवाद्याकडे कुलाबा येथील ज्यूंचे प्रार्थनास्थळ असलेल्या ‘छाबड हाऊस’ची छायाचित्रे सापडली !

‘छाबड हाऊस’च्या सुरक्षेत वाढ !

कुलाबा येथील ज्यूंचे प्रार्थनास्थळ असलेले ‘छाबड हाऊस’

मुंबई – महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाला एका संशयित आतंकवाद्याकडे कुलाबा येथील ‘छाबड हाऊस’ची छायाचित्रे सापडली. यामुळे महंमद इम्रान महंमद युनूस खान आणि महंमद युनूस महंमद याकूब साकी या आतंकवाद्यांना राजस्थान येथून अटक करण्यात आली. यानंतर छाबड हाऊसच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, तसेच तेथे ‘मॉकड्रील’ (अभासी संकटातील कारवाईचे प्रात्यक्षिक) घेण्यात आले. छाबड हाऊसमध्ये आधीच अतिशय उच्च दर्जाची सुरक्षा आहे.

(सौजन्य : Zee News)

सध्या हे दोघे आतंकवादी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात आहेत. त्यांच्यावर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ५ लाख रुपयांचे पारितोषिकही घोषित केले आहे. दोन्ही आरोपी ‘अल् सुफा’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे.