गोवा, उत्तरप्रदेश आणि पंजाब येथून भाजपच्या सूर्यास्ताला प्रारंभ ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

भाजपपासून गोव्याला वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप हे दोघेही एकत्रितपणे काम करणार आहेत. व्यापक ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही स्वहिताच्या लहानसहान सूत्रांकडे दुर्लक्ष करणार आहोत.

आगामी निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि मगोप यांची युती जिंकणार !  ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

“बंगालमध्ये ज्या पद्धतीने योजनाबद्धरित्या निवडणूक जिंकली, त्याप्रमाणे गोव्यासाठीही आमची विशेष योजना आहे. मी सर्व धर्म आणि जाती यांच्यासाठी काम करते” – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या प्रकरणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गोवा पोलीस आणि उच्च न्यायालय यांच्याकडे तक्रार प्रविष्ट

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ‘प्रिव्हेशन ऑफ इन्सल्टस् टु नॅशनल हॉनर अ‍ॅक्ट १९७१’ आणि ‘एम्.एच्.ए. ऑडर २०१५’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सोलापूर येथील भाजप युवा मोर्चाच्या वतीने ममता बॅनर्जींवर गुन्हा नोंद करण्याची मागणी !

नुकतेच मुंबई दौर्‍यावर असतांना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रगीताच्या ४ ते ५ ओळी उच्चारून राष्ट्रगीत पूर्ण न करता निघून गेल्या.

लुईझिन फालेरो यांना तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेत पाठवण्याची सिद्धता

तृणमूल काँग्रेस पक्षाने गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांना राज्यसभेवर पाठवण्याची सिद्धता केली आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा करण्यात आली.

बंगालमध्ये महिलांवर झालेच्या अत्याचारावरून मी तृणमूल काँग्रेसचा निषेध करतो !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकशाही म्हणजे काय ? हे अगोदर शिकून घेतले पाहिजे आणि त्यानंतरच इतर राज्यांचा दौरा केला पाहिजे. गोव्यात कुठलाही राजकीय पक्ष येऊ शकतो; मात्र राजकारणात घराणेशाही रुजवायला देऊ नये.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे राहुल गांधी राजकीय पर्यटनासाठी गोव्यात ! – तेजस्वी सूर्या, खासदार, भाजप

ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी राजकीय पर्यटनासाठी गोव्यात आले आहेत, असा आरोप भाजपचे तेजस्वी सूर्या यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

ममता बॅनर्जी या प्रादेशिक पक्षांच्या अभिमानाचे प्रतीक ! – विजय सरदेसाई, आमदार

‘गोवा फॉरवर्ड’ पक्ष हा तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केला जाणार नाही. लोकांना असे झालेले नको; मात्र निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांना संघटित करणे आवश्यक आहे.

काँग्रेस पक्ष राजकारणाविषयी गंभीर नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक शक्तीशाली होणार ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

‘‘काँग्रेस पक्ष राजकारण गांभीर्याने घेत नाही. काँग्रेस पक्ष कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. मग त्यासाठी देशाने का भोगले पाहिजे ?’’ – ममता बॅनर्जी

(म्हणे) ‘मी जन्माने हिंदु आहे आणि मला भाजपने हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही !’  ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विविध मंदिरे आणि तपोभूमी यांना भेट