एकनाथ शिंदेकोल्हापूर – ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला विभाग स्तरावरील प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला असून त्यात २ कोटी रुपयांचे पारितोषिक महापालिकेला मिळणार आहे. याचसमवेत कोल्हापूर महानगरपालिकेची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेली असून त्याचे सादरीकरण ९ जानेवारीला होणार आहे.
१५ सप्टेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये नगर विकास विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ घोषित करण्यात आलेली होती. त्यामध्ये राज्य आणि विभाग स्तर, अशी पारितोषिके घोषित करण्यात आली होती. याचे सादरीकरण पुणे विभागीय आयुक्त यांचे समोर करण्यात आले होते, तसेच पुणे विभागीय आयुक्त यांच्या समितीने कोल्हापूर शहराची पडताळणी गत मासात केली होती. या स्पर्धेचे निकाल घोषित झालेले असून पुणे विभागात ‘ड’ वर्ग महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक आलेला आहे.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार