(म्हणे) ‘वटपौर्णिमा केवळ सुवासिनींचा सण नाही, त्यामुळे विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

शास्त्र समजून न घेता केवळ प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी प्रत्येक वेळी हिंदु प्रथा-परंपरा यांची खिल्ली उडवली जात आहे आणि धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु समाज त्याला बळी पडत आहे, हे दुर्दैवी आहे !

(म्हणे) ‘लिंग आणि योनी यांची पूजा करून देशाला नष्ट करत आहेत हिंदू !’

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरून अशा प्रकारे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवणे अक्षम्य आहे. पोलिसांनी अशांवर स्वत:हून कठोर कारवाई करायला हवी !

अलीगढ मुस्लिम विद्यापिठातील हिंदु प्राध्यापकानेच केले देवतांचे अश्‍लाघ्य विडंबन !

एका इस्लामी विद्यापिठात जर हिंदु प्राध्यापकच त्याच्या श्रद्धास्थानांचा अनादर करत असेल, तर अन्य धर्मीय हिंदु धर्माचा आदर करतील का ?

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !

हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’

पाथर्डी (नगर) येथील मढी येथे श्री कानिफनाथ यांचा वाढदिवस केक कापून साजरा !

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांचा परिणाम ! हिंदूंनी एकत्र येऊन याविषयी देवस्थानच्या विश्वस्तांना वैध मार्गाने जाब विचारायला हवा !

‘व्हॅलेंटाईन डे’ ही पाश्चात्त्य कुप्रथा बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीची प्रबोधन मोहीम !

व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करणे, म्हणजेच पर्यायाने हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे होय ! त्यामुळे हिंदूंच्या एक दिवसाच्या वैचारिक धर्मांतराला प्रोत्साहन मिळते.

हिंदूंनो, व्यासपिठाचा सन्मान राखणे, हा आपला धर्म आहे, हे लक्षात घ्या !

आज हिंदूंचा अहंकार साधनेच्या अभावामुळे उंच शिखरावर आढळतो. त्यात व्यासपिठावर आसनस्थ झालेल्या अतिथींना जरी विनम्रतेने त्यांच्या चुकीची जाणीव करवून दिली, तरी त्यांचा अहं त्वरित दुखावला जातो.

‘दिवाळी पहाट’सारख्या गीतगायनाच्या कार्यक्रमांपेक्षा दीपावलीच्या पहाटे धर्मशास्त्रानुसार कृती करा !

‘दिवाळी पहाट’सारख्या गीतगायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यापेक्षा परंपरागत धर्मशास्त्रानुसार दीपावली साजरी करून धर्माचरण करणे अपेक्षित आहे. शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी किंवा अशा कार्यक्रमांसाठी संपूर्ण दिवस किंवा अन्य दिवसही असतात.

सणानिमित्त शुभेच्छा देतांना एकमेकांना शुभेच्छापत्र देण्याऐवजी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्याव्यात !

सणांनिमित्त आपल्याकडून उत्स्फूर्तपणे काहीच न लिहिलेल्या एका कागदाच्या तुकड्यावर इतरांनी लिहिलेल्या भावनाशून्य संदेशातून कधी आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त होईल का ?

नाशिक येथील महापालिकेच्या सभेत फटाकेबंदीचा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळला !

‘हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी फटाके उडवावेत’, असे धर्मशास्त्रात सांगितलेले नाही, तसेच मनोरंजन आणि करमणूक यांसाठी फटाके उडवून लाखो रुपयांची उधळपट्टी होते. त्यातूनच राष्ट्रहानी होते, हे लक्षात घ्यायला हवे !