प्रत्येक हिंदु धर्मियाने धर्मानुसार कृती करणे आवश्यक ! – प.पू. उल्हासगिरी महाराज
भारत भूमीमध्ये इंग्रजांना जाऊन ७५ वर्षे उलटली, तरीही पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आपल्या देशात चालू आहे. ते आपल्या संस्कृतीला घातक असून प्रत्येक हिंदु धर्मियाने धर्मानुसार कृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तालुक्यातील कोंडीवळे येथील प.पू. गगनगिरी महाराज मठाचे मठाधिपती प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी केले.